रविवार २७ ऑगस्ट २०२३
आज इकडच्या एका कार्यक्रमाला गेले होते.
One world day celebration
अमेरीकेत जगातील सर्व देशातील लोक येऊन रहातात (नोकरी, शिक्षण या साठी) ईशान्य ओहायो मधील क्लीवलंड शहरामधे गवर्नमेंटने अशी जागा दिली आहे, तिकडे प्रत्येक देशाचे सेपरेट गार्डन आहे आणि त्यावर त्यांच्या देशाचा झेंडा लावलेला आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात तिकडे असा हा एक दिवस साजरा करतात.
आजचा दिवस असा होता की प्रत्येक देशाचे लोक आपल्या आपल्या गार्डन मधे जमतात. तिकडे आगोदर जाऊन सजावट करतात. आपल्या देशाचा ड्रेस घालुन येतात. आपले झेंडे घेऊन येतात.
कडक सिक्युरीटी आसते. आपल्या गाड्या गार्डन एरीयात नेता येत नाहीत. आपल्या गार्डनपासुन स्टार्टींग पाॅईंटला जाण्यासाठी गोल्फकार्टची सोय केलेली असते. स्टार्टींग पाॅईंटला सगळे जमतात आणि मग परेड चालु होते. अनाऊंसमेंट चालु आसते त्याप्रमाणे एक एक देश परेड मधे सामील होतो.
आपल्या देशाच्या नावाचा बोर्ड आणि आपला झेंडा घेऊन (हा झेंडा घेण्याचा पण मान आसतो) आपल्या देशाचे वाद्य वाजवत, नाचत , खेळत परेड पुढे पुढे जाते. शेवटी हा झेंडा एका ठरावीक ठीकाणी ऊभा ठेवला जातो. एका पाठोपाठ एक असे सर्व देशांचे झेंडे तिकडे ठेवले जातात.
त्यानंतर सगळे आपल्या आपल्या गार्डन मधे जातात. सगळे भारतवासीय , महाराष्ट्रीय, गुजराथी, केरळी, मद्रासी, कानडी, पंजाबी, बंगाली ई. यात सहभागी होते. छान सजावट केली होती. गार्डनमधे आगोदरच अमेरीकेचा आणि आपल्या देशाचा असे दोन झेंडे तिकडे ठेवलेले आसतात.
आगोदर अमेरीकेचा झेंडा वंदन आणि राष्ट्रगीत होते. नंतर आपल्या देशाचे झेंडा वंदन आणि राष्ट्रगीत होते. झेंड्यामधे फुले आणि फुलांच्या पाकळ्या ठेवल्या होत्या ( झेंडा ऊघडताना फुलांचा वर्षाव झाला )
नंतर मान्यवरांचे भाषण ( मोजक्या शब्दात,थोडक्यात ) नंतर करमणुकीचे कार्यक्रम. लहान मुलांपासुन मोठ्यांपर्यन्त सारे ऊत्साहानी सादर करत होते. गाणी, श्लोक, प्रार्थना, वेगवेगळी नृत्य, नाट्यछटा, काही कवायतीचे प्रकार, बासरी वादन, सतारवादन आसे विवीध कार्यक्रम चालु होते. आणि तिकडे प्रत्येक फॅमीली बसण्यासाठी आपली आपली फोल्डींगची खुर्ची घेऊन येतात. आणि आगदी छान कार्यक्रम एन्जाॅय करतात.
एका बाजुला खाण्याचा फुड ट्रक ऊभा असतो. तसेच ईतर अनेक स्टाॅल असतात. कोणत्याही देशाची लोक कोणत्याही स्टाॅलवर जाऊन खाण्याची कींवा ईतर वस्तुंची खरेदी करु शकतात.
आणि हो अजुन एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली.
बरीचशी लहान मुल , मोठी माणस देखील हातात पासपोर्ट घेऊन प्रत्येक देशाला भेट देत होती. हा पासपोर्ट म्हणजे छोटीशी डायरी. या पासपोर्ट मधे प्रत्येक पानावर दोन देशांची नावे होती अशी सगळ्या देशांच्या नावाचा असलेला पासपोर्ट. वेगवेगळ्या देशांच्या स्टाॅलवर येउन स्टॅम्प मारुन घेत होते. भाषा वेगळी अगदी लहान मुले पण बोर्ड वरचे नाव बघुन त्या देशाचे पान काठून देत होते स्टॅम्प साठी. आपल्या देशाचा नकाशा, झेंडा, ताजमहल, ई. स्टॅम्प ठेवले होते. थोडावेळ मीदेखील आपल्या स्टाॅलवर हे स्टॅम्प मारून देण्याचा आनंद घेतला. या संपुर्ण सोहळ्यात मला सहभागी होता आले.
खुप खुप मजा, आनंद,, वेगळाच अनुभव. अगदी अविस्मरणीय दिवस.