top of page

माझा प्रवास

अजय वैद्य

माझा प्रवास

नमस्कार! मी मे 2022 मध्ये नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी, बोस्टन, मॅसेच्युसेट्स मधून डेटा ॲनालिटिक्समध्ये MS घेऊन पदवी प्राप्त केली. पदवी घेतल्यानंतर लगेचच, मला मॅसेच्युसेट्स मध्ये हेल्थकेअर स्टार्टअपमध्ये Sr Data Analyst म्हणून नोकरी मिळाली. मला मॅसॅच्युसेट्स आणि पेनसिल्व्हेनियामधील मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि क्लाउड स्पेस यांसारख्या विविध उद्योगांमध्ये काम करण्याची एक चांगली संधी मिळाली. उच्च शिक्षण उद्योगात काम करणे हा माझ्या आयुष्यातील एक मोठा निर्णय होता परंतु मला ते कसे आहे हे प्रत्यक्ष अनुभवायचे होते. मला अक्रोन विद्यापीठात Data Analyst म्हणून नोकरी मिळाली.


मी नोव्हेंबर 2022 मध्ये Akron, Ohio येथे राहायला गेलो. मी जिथे काम करतो त्याच्या जवळच मला एक अपार्टमेंट सापडले त्यामुळे माझा प्रवासात वेळ वाचला.


मी NEOMM (ईशान्य ओहायो मराठी मंडळ) मधल्या मकर संक्रांती ते दिवाळी पर्यंतच्या विविध कार्यक्रमांबद्दल ऐकले होते. मी त्यांच्या एका कार्यक्रमात गेलो आणि लगेचच मी ठरवले की मला NEOMM चा सदस्य व्हायचे आहे. ग्रुपमध्ये सामील होऊन मी ईशान्य ओहायो आणि आसपासच्या वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधला. ओहायोमध्ये बरेच मराठी भाषिक लोक आहेत जे मदत करण्यास आणि connect होण्यास तयार आहेत! ओहायोमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मराठी भाषिक लोकांशी मी connect झालो आणि मी ओहायोमध्ये चांगले मित्र बनवले!



मराठी पाऊल पडते पुढे!

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page