Latest News
ताज्या घडामोडी
Jan 1, 2024
२०२४ मराठी शाळेची नावनोंदणी
२०२४ सालाकरिता मराठी शाळेची नावनोंदणी सुरू करण्यात येणार आहे. आपल्या मुलांनी मराठी शिकण्याचे अनेक फायदे आहेत.
१ ) आजीबरोबर मराठीतून "face-time" करता येईल.
२ ) भारतामधील आते-मामे-चुलत भावंडांबरोबर इंग्लिश लिपीतून मराठी “chat” करता येईल. 😛
३ ) महाराष्ट्रात दुकानांवरील पाट्या वाचायला अडचण येणार नाही.😀
Aug 12, 2023
श्री. सुदर्शन साठे यांच्याकडून 'गीता सार' विषयावर व्याख्यानं
दिनांक 12 ऑगस्ट रोजी आपल्याला श्री. सुदर्शन साठे यांच्याकडून 'गीतासार' रूपात श्रीमद्भग्वद्गीतेतील काही श्लोकांचे असेच अतिशय साध्या, सोप्या रूपात निरूपण ऐकायला मिळाले. अर्थात त्यांना समजलेली गीता त्यांच्या ओघवत्या वाणीत ऐकणे ही एक पर्वणीच होती. तत् त्वम असि| ह्या तीन शब्दांचा सुंदर अर्थ त्या दिवशी त्यांच्याकडून समजला.
Apr 8, 2023
श्री महेश काळे यांचा स्वरोत्सव ठरला Super Hit!
ईशान्य ओहायो मराठी मंडळातर्फे सुप्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय संगीत गायक श्री महेश काळे यांचा स्वरोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला होता. शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ च्या संध्याकाळी पार पडलेला हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांसाठी एक यादगार अनुभव ठरला.
Mar 5, 2023
प्रसिद्ध वक्ते श्री राहुल सोलापुरकर यांचे स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांच्यावर व्याख्यानं
शनिवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध वक्ते श्री राहुल सोलापुरकर यांचे स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांच्यावर व्याख्यानं झाले. Mayfield पब्लिक लायब्ररीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.
Jan 16, 2023
मकर संक्रांत २०२३ चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
ईशान्य ओहायो मराठी मंडळाने मकर संक्रांत २०२३ चा कार्यक्रम, रविवार १५ जनेवारीला मोठ्या उत्साहत साजरा केला. Willoughby हिल्स कम्युनिटी सेंटर येथे पार पडल ेल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येत सदस्यांनी उपस्थिती लावली. २०२३ च्या पहिल्याच कार्यक्रमाला सदस्यांचा मिळाललेला प्रतिसाद वाखाण्याजोगा होता. यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते “क्लीव्हलँड होम मिनिस्टर" हि स्पर्धा.
Jan 4, 2023
श्री सुदर्शन साठे : क्लिवलँड इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम २०२३
क्लिवलँड इंटरनॅशनल हॉल ऑफ फेमचा 2023 वर्ग हा 84 पात्र नामांकनांमधून निवडला गेला. नामनिर्देशित व्यक्तींची यादी CIHF च्या पूर्वीच्या इंडक्टीसकडे पाठवण्यात आली होती. आपल्या ईशान्य ओहायो मराठी मंडळाचे ज्ञात सदस्य आणि मार्गदर्शक श्री. सुदर्शन साठे यांची २०२३ च्या वर्गातील एक सदस्य म्हणून निवड झाली आहे.