
हेमंत जाधव (NEOMM Webmaster)
Mar 5, 2023
शनिवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध वक्ते श्री राहुल सोलापुरकर यांचे स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांच्यावर व्याख्यानं झाले. Mayfield पब्लिक लायब्ररीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमासाठी अनेक पालकांनी आपल्या युवा मुलांसोबत हजेरी लावली जेणेकरून मुलांना भारतीय स्वातंत्र्य चळवळी विषयी आणि वीर सावरकरांच्या योगदानाची ऐतिहासिक माहितीची होईल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशान्य ओहायो मराठी मंडळाचे उपाध्यक्ष श्री शेखर गणोरे यांनी श्री राहुल सोलापुरकर यांचा परिचय करून दिला. बीएमएमचे अध्यक्ष श्री संदीप दीक्षित आणि श्री शेखर गणोरे यांनी श्री राहुल सोलापूरकर यांचे कार्यक्रमासाठी स्वागत केले.
व्याख्याना दरम्यान श्री राहुल सोलापूरकर यांनी वीर सावरकरांच्या जीवनातील विविध कथा सांगितल्या. मातृभूमी आणि मातृभाषेबद्दल वीर सावरकरांचे प्रत्येक कथेतून दिसत होते. राहुल सोलापुरकर यांनी सांगितलेल्या विविध घटना मधून वीर सावरकरांनी केलेला त्याग आणि संघर्ष दिसून आला. सावरकरांच्या जीवनातील गोष्टी सांगताना सोलापुरकर यांनी दिलेले ऐतिहासिक संदर्भ, तथ्ये आणि पुराव्यांसह स्पष्ट करुन सांगितले .