
हेमंत जाधव (NEOMM Webmaster)
Jan 5, 2023
वर्ष २०२३ चे वार्षिक विश्व मराठी संमेलन, दिनांक जानेवारी ४, २०२३ पासून ३ दिवस मुंबई येथे आयोजित केले गेले होते. “मराठा तितुका मेळवावा” या बोधवाक्याला समर्पक असेच जगभरातल्या विविध मराठी मंडळांचे सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते. ३ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांचा हस्ते झाले.
बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने BMM चे अध्यक्ष आणि ईशान्य ओहायो मराठी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री संदीप दीक्षित यांनी प्रतिनिधित्व केले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती झाल्या. श्री. संदीप दीक्षित यांनी आपल्या मुलाखतीतून BMM आणि अमेरिकेतल्या विविध मराठी मंडळांची स्थापना कशी झाली तसेच मंडळांची प्रगती यावर आपले मनोगत मांडले.

ही मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
ईशान्य ओहायो मराठी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री संदीप दीक्षित यांना त्यांच्या BMM च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.